गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

२०२०

 २०२० चा रकाना तसाच रिकामा जाऊ नये म्हणून काहीतरी लिहायला हवंय. आयुष्यातलं अजून एक वर्ष संपतंय, पण आपल्याला नक्की काय हवंय आणि काय नकोय हे अजूनही समजत नाहीये. कधी येईल विचारांची इतकी परिपक्क्वता? कधी येईलच की नाही ते सुद्धा माहिती नाही. पण सोशल मीडिया पासून थोडा दूर गेल्यापासून जरा बरं वाटतंय.

उगीचच राजकारण, नसते वाद, कोणाच्या आयुष्यात कोणाचं काय चाललंय याचा कधी खरा तर कधी खोटा दिखावा या सगळ्यातून डोकं जरा बाजूला झाल्यामुळे चांगले विचार करण्यासाठी थोडा वेळ मिळत आहे. आपण बरं आणि आपलं आयुष्य बरं यातही बरंच सूख आहे हे समजतंय. अशाच अजून चांगल्या काही गोष्टी २०२१ मध्येही शिकायला मिळोत आणि सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा!

५ टिप्पण्या:

  1. या कॅलेंडर वर्षात महिन्यातून लहानशी का होईना ब्लॉग पोस्ट लिहीली आणि पोस्ट केली गेलीच पाहीजे असा संकल्प कर.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद दादा. 
    हो, नक्कीच लिहिण्यात सातत्य आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तू नेहमी प्रोत्साहन देतोस त्यामुळेही हुरूप येतो. शिवाय चांगलं वाचतही राहणार आहे, त्यामुळे तू पण लिहीत राहा ही विनंती :)

    उत्तर द्याहटवा