मधुर शब्द, कटू शब्द,
अर्थपूर्ण शब्द नि निरर्थक शब्द
अमृतात ओथंबलेले शब्द
तर काही अगदीच कोरडे शब्द
आतून आलेले शब्द
नि वरवरचे शब्द
प्रत्येक शब्द वेगळा
स्वत:चं अस्तित्व जपणारा!
काही शब्द निरर्थक वाटतात
पण तरीही ते गूढ असतात..
शब्दांच्या खेळात फक्त शब्दच असतात...
स्पर्धीही तेच अन प्रतिस्पर्धीही तेच
एकमेकांशी द्वंद्व करता करता
माणसाच्या जीवणीवर नाचत असतात..
कधी कधी मात्र शब्दांच्या पलीकडले
शब्दही बोलू शकत नाहीत...
नजरच न बोलता सर्व बोलते
आणि शब्द मध्ये पडत नाहीत....
अर्थपूर्ण शब्द नि निरर्थक शब्द
अमृतात ओथंबलेले शब्द
तर काही अगदीच कोरडे शब्द
आतून आलेले शब्द
नि वरवरचे शब्द
प्रत्येक शब्द वेगळा
स्वत:चं अस्तित्व जपणारा!
काही शब्द निरर्थक वाटतात
पण तरीही ते गूढ असतात..
शब्दांच्या खेळात फक्त शब्दच असतात...
स्पर्धीही तेच अन प्रतिस्पर्धीही तेच
एकमेकांशी द्वंद्व करता करता
माणसाच्या जीवणीवर नाचत असतात..
कधी कधी मात्र शब्दांच्या पलीकडले
शब्दही बोलू शकत नाहीत...
नजरच न बोलता सर्व बोलते
आणि शब्द मध्ये पडत नाहीत....
मस्त...
उत्तर द्याहटवा>>नजरच न बोलता सर्व बोलते
आणि शब्द मध्ये पडत नाहीत
हे खुप आवडल.. :)
Khup dhanyavad Yogesh :)
उत्तर द्याहटवा