गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

सवय...

मी पाणी खूप कमी पिते असं सगळे मला सांगतात. खरं तर लहानपणी व्यवस्थित पाणी प्यायलं जायचं. पण माझी एक मैत्रीण होती शाळेतली. ती आणि मी रोज शाळेत एकत्र चालत जायचो. तिने एकदा बोलता बोलता सांगितलं की ती खूप पाणी प्यायची म्हणून तिच्या पाठीमध्ये पाणी झालं आणि मग ऑपरेशन करून ते काढून टाकावं लागलं तेव्हा चार तांबे पाणी निघालं. आता तेव्हा इतकं कळायचं वय नव्हतं की जास्त पाणी प्यायल्याने पाठीत पाणी वगैरे होत नाही, काहीतरी आजार झाला तरच होतं. पण ते ऐकल्यापासून माझंच पाणी पिणं कमी होऊन गेलं आणि आता ती सवयच बनून गेली.

असंच पुन्हा शाळेत असतानाच कोणाच्यातरी गप्पांमध्ये असं ऐकलं की, एक शाळकरी मुलगा होता. शाळेत जाताना त्याने शाळेचे बूट घातले तर त्यात विषारी पाल होती. त्याच्या ते लक्षात आलं नाही. आणि त्या पालीचं विष त्याच्या शरीरात भिनून त्याचा मृत्यू झाला. हे ऐकलं आणि दुसऱ्याच दिवसापासून मला माझे बूट ३-४ वेळा सगळीकडून झटकून घेऊन मगच घालायची सवय लागली. ही सवयदेखील आजतागायत कायम आहे. 

कधीतरी एकदा चहा प्यायला आणि चहाची सवय होऊन गेली. व्यायाम मात्र हजारदा सुरु केला आणि हजारदा सुटला पण त्याची सवय काही व्हायला तयार नाही. वाईट सवय लागणं सोपं आणि सुटणं अवघड तर चांगली सवय लागणं अवघड आणि सोडणं सोपं असतं. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे काही उगीचच लागलेल्या सवयी असतात, ज्या सुटता सुटत नाहीत. सवयीचं रुपांतर व्यसनात झालं की मग मात्र ते सोडवणं खरंच अवघड होऊन बसतं, आणि बाकी व्यसनं तरी सोडवता येतील पण एखाद्या माणसाचं व्यसन लागलेलं कसं सोडवायचं… 


८ टिप्पण्या:

  1. अगदी बरोबर !! माणसाचं व्यसन जिवघेणं !

    उत्तर द्याहटवा
  2. हो ना, इतर व्यसनांमध्ये तरी ती एकच गोष्ट हवी असते. पण माणसाच्या व्यसनामध्ये त्याचं बोलणं, हसणं, असणं, वागणं, अनुभवणं, वाटणं आणि बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हवा असतो.
    प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद matichi mulagi :)

    उत्तर द्याहटवा
  3. ऑब्सेसिव कम्पल्सिव डिसऑर्डर :)

    उत्तर द्याहटवा
  4. Yes perhaps Heramb... :P
    And it seems need something like Eternal Sunshine of the Spotless Mind for the last one... :)

    उत्तर द्याहटवा
  5. बाकी व्यसनं तरी सोडवता येतील पण एखाद्या माणसाचं व्यसन लागलेलं कसं सोडवायचं….........एकदम परफेक्ट.

    उत्तर द्याहटवा
  6. खूप धन्यवाद विजयजी. तुमच्या ब्लॉगला हल्ली खालील error मुळे भेट देता येत नाहीये ...

    The site ahead contains harmful programs

    Attackers on maymrathi.blogspot.com might attempt to trick you into installing programs that harm your browsing experience (for example, by changing your homepage or showing extra ads on sites you visit).

    उत्तर द्याहटवा
  7. That reminds me a humorous quote "Who says leaving smoking (bad habit) is difficult ? I have done it so many times"

    उत्तर द्याहटवा