माझी मराठी सौंदर्याची खाण
हिचा तर आम्हाला चिरंतन अभिमान...
ज्ञानेश्वरी, भागवत नि तुकारामांच्या गाथा
यांना लेवून तेजाने तळपतो हिचा माथा...
हिच्यातला प्रत्येक शब्द दवबिंदूत भिजलेला
एखादा इतका मृदू कि ओठांवरच थिजलेला...
हि संस्कृतकन्या नवी नाती बांधते
सातासमुद्रापारही आज सुखाने नांदते...
खानदानीपणा तर मुळातच हिच्यात
सात्विकतेची आभा लपत नाही कशात...
माझी मराठी हे वाग्देवीचे वाण
गरज पडली कधी तर धनुष्यातला बाण...
दुर्लक्षली गेली तरी इतकी सहनशील
लेकरांना माफ करणारी साक्षात क्षमाशील...
तरीही तुझं अस्तित्व संपायला प्रलयच यावा लागेल
आचंद्रसूर्य इथे तुझेच राज्य असेल....
wah wah... :)
उत्तर द्याहटवाधन्यवाद मनस्विता ....
उत्तर द्याहटवाsuperb yar !! gr8 writing
उत्तर द्याहटवाखुप सुंदर ग...आवडली....
उत्तर द्याहटवाअस बरच काही येऊन दे आता ब्लॉगवर....शुभेच्छा...!!!
धन्यवाद निवी.. आणि दवबिंदू.... प्रयत्न करेन... :)
उत्तर द्याहटवाKhupach chan aahe... vatat nahi ki hi tuzi pahili kavita aahe... :)
उत्तर द्याहटवाखुप सुंदर आवडली...असेच लिहीत रहा... :) :)
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद स्नेहल आणि योगेश....
उत्तर द्याहटवाare wahhhh ...indu ! chaan lihites ga tu....! gr8 ..keep it up!
उत्तर द्याहटवाधन्यु वेरी मच अतुल.... :)
उत्तर द्याहटवा