शुक्रवार, १३ जुलै, २०१२

अपूर्ण...

               आज सगळी महत्त्वाची कामं बाजूला ठेवून पहिलं ते गाणं पुन्हा डाउनलोड केलं. आणि आता अगदी स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटतंय. झालं असं की एक गाणं अचानक ऐकण्यात आलं आणि आवडलं. नेहमीच्या सवयीप्रमाणे एखादं गाणं नवीननवीन ऐकण्यात आलं असेल तर निदान आठवडाभर तरी माझ्याकडून त्या गाण्याचा फडशाच असतो.
                 
                तर ते गाणं मी दोन-तीन दिवसांपासून दिवसातून वेळ मिळेल तेव्हा अधूनमधून ऐकत होते पण यु-ट्यूब वर. मग वाटलं हे आपल्याकडे असायला हवं. म्हणून एमपी3 कन्वर्टर वरून ते मिळवलं. आता मला हवं तेव्हा ते मी ऐकू शकत होते. पण गम्मत अशी झाली होती की गाणं कन्वर्ट होताना अगदी शेवटच्या कडव्यातलं  शेवटचं वाक्य पूर्ण आलंच नव्हतं. अगदी शेवटचाच शब्द राहिला होता.

              एक-दोन वेळा मी ते तसंच ऐकलं. मुळात  गाणं लावताना माझ्या लक्षातच राहायचं नाही की हे अर्धवट आहे. पण गाणं संपताना तो शेवटचा शब्द ऐकू यायचा नाही, आणि जो काही मूड तयार झालेला असायचा तो सगळा एकदम फस्स होऊन जायचा. अगदीच रसभंग! म्हणजे गाणं ऐकल्याचा आनंद मिळण्याऐवजी मी ते का ऐकलं याचं दु:ख! आज परत शेवटची ओळ अर्धवट राहिली आणि पहिलं मी ते गाणं पुन्हा डाउनलोड केलं.

               एक गाणं अर्धवट; नाही अर्धवटही नाही, फक्त ते पूर्णत्वाला नाही गेलं तर इतकी घालमेल, मग देव न करो पण जर एखादं नातं अर्धवट राहिलं तर....

छायाचित्र आंतरजालावरून 


१८ टिप्पण्या:

  1. अपूर्णत्व दाखवणारा यथार्थ लेख...
    अस व्हावं एखादी सुंदरा दिसावी, पण पदर मात्र असा की चेहराच शेवटपर्यंत दिसू नये... तस हे जे कौतुक ज्या गीताच केलंय त्याची काहीच भनक लागू दिली नाहीये, मात्र चित्रण अगदी जिवंत आहे... तिच ती घालमेल, अजून एक अपूर्णत्व!

    उत्तर द्याहटवा
  2. एक गाणं अर्धवट; नाही अर्धवटही नाही, फक्त ते पूर्णत्वाला नाही गेलं तर इतकी घालमेल, मग देव न करो पण जर एखादं नातं अर्धवट राहिलं तर...

    नात्यांना सर्वस्व मानणार्‍यांना हे आयुष्यभर पुरून उरू शकतं हे अर्धवट नात्याचं दुःख...

    उत्तर द्याहटवा
  3. "गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा" .....पण प्रत्येक नात्यात नक्कीच नाही. काही खास नात्यांमध्ये तर नक्कीच नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. पूर्ण वेळ गण्याबद्दल बोलून त्य गाण्याचा पत्ता न लागू देता वाचकांनाही तुझ्याबरोबरच 'अपूर्ण'तेचा परफेक्ट अनुभव मिळवून दिलास !! सुपर्ब...

    शेवटची ओळ टोकदार :((

    उत्तर द्याहटवा
  5. नात्यांना सर्वस्व मानणार्‍यांना हे आयुष्यभर पुरून उरू शकतं हे अर्धवट नात्याचं दुःख... +10000000000000000000000000000000

    उत्तर द्याहटवा
  6. खूप धन्यवाद अभिषेक,
    गीत माझ्यासाठी हे होतं, तुमच्यासाठी वेगळंही असू शकेल, पण अर्धवट राहिलं तर होणारी घालमेल तुमची माझी कोणाचीही तीच असेल ना,

    बाकी सुंदरेचं वर्णन अप्रतिम :)

    उत्तर द्याहटवा
  7. प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद आल्हादजी,

    खरंय, नात्यांना सर्वस्व मानणाऱ्यांना कधीकधी या दु:खाला सामोरं जावं लागतं, आणि कधीकधी नात्यांची आजीबात किंमत नसणाऱ्यांना सगळ्या नात्यांमधून भरभरून शेवटपर्यंत प्रेम मिळत राहतं...

    ब्लॉगवर तुमचं स्वागत :)

    उत्तर द्याहटवा
  8. खूप धन्यवाद अनघाताई,

    >>"गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा",

    गाणं म्हणून ऐकायचं तर खरंच खूप सुंदर आहे, पण नात्यांमध्ये अपूर्णता सहन करायची झाली तर त्यासाठी खूप मोठी मानसिक शक्ती हवी...
    आणि सहन करायची वेळ आलीच तर देव ती शक्ती देवो....

    उत्तर द्याहटवा
  9. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हेरंबजी,

    तुम्हाला पोस्ट आवडली याबद्दल अनेक आभार :)
    शेवटची ओळ... ह्म्म्म, खरंच विचारही करवत नाही... अगदी कोणत्याच नात्याबद्दल...

    उत्तर द्याहटवा
  10. @हिंदोळे मनाचे,

    ब्लॉगवर तुमचं हार्दिक स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  11. "गाणं अचानक ऐकण्यात आलं आणि आवडलं. नेहमीच्या सवयीप्रमाणे एखादं गाणं नवीननवीन ऐकण्यात आलं असेल तर निदान आठवडाभर तरी माझ्याकडून त्या गाण्याचा फडशाच असतो."
    सेम टु सेम हं... अगदी माझ्या मनातलं कॉपी केलंत.

    उत्तर द्याहटवा
  12. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद विजयजी,
    खरंच एखादं गाणं नवीन ऐकण्यात आलं, आणि त्यातली एक जरी गोष्ट आपल्याला भावली, मग त्याचे शब्द असोत, चाल असो, त्यातल्या एखाद्या विशिष्ठ वाद्याचा ताल असो.... अगदी काहीही आवडलं तरी ते गाणं न ऐकता पूर्ण लक्षात राहत नाही तोपर्यंत तरी ऐकतच रहावसं वाटतं....

    ब्लोगवर तुमचं स्वागत :)

    उत्तर द्याहटवा
  13. हेरंबजी??????? बरी आहेस ना? प्लीजच !!!

    उत्तर द्याहटवा
  14. अगदी जिवंत चित्रण केल आहेस अपूर्णतेच ,त्या घालमेलीच... अप्रतिम ..!!!

    उत्तर द्याहटवा