छायाचित्र आंतरजालावरून |
महागलेय जीवन,
पण स्वस्तही इथे बरंच काही आहे
कोण म्हणतं महागाई वाढते आहे?
स्वस्त इथे खून,
स्वस्त लोकांचे जीव
आणि स्त्रीभ्रूणही इथे कचऱ्यात आहेत,
कोण म्हणतं महागाई वाढते आहे?
स्वस्त आता अत्याचार,
स्वस्त झालीये लुटालूट,
बलात्कारालाही बघे इथे आहेत
कोण म्हणतं महागाई वाढते आहे?
स्वस्त आहे भ्रष्टाचार,
पुढारी तो लाचार,
घोटाळे तर न मोजणेच इष्ट आहे
कोण म्हणतं महागाई वाढते आहे?
लाखोंची डोनेशनं, करोडोंची लाच
दारू नि बायांचा नंगानाच
नैतिकता मात्र महागते आहे....
तिथेच तर महागाई वाढते आहे....
Realistic.. :).....बरंच काही खटकलेले एका कवितेत...:)
उत्तर द्याहटवाधन्यवाद श्रियाताई....
उत्तर द्याहटवावर्तमानपत्र वाचून सुचलेली कविता... म्हणजे रोज तेच तेच असतं पेपरात... आता तर वाटतंय जगात काय होतंय ते तर आपण थांबवू शकत नाही मग आता पेपर वाचणंच बंद करावं... :(
इंद्रधनू, म्हणूनच मी गेल्या काही वर्षांपासून वर्तमानपत्र वाचत नाही! पण एक सांगू? बरंच काही चांगलही घडत असतं आसपास, अगदी आपल्या नजरेसमोर .. पण त्याची बातमी होत नाही इतकंच .. त्यामुळे All is not well हे जरी खरं असलं तरी All is not over YET असं मला वाटतं!
उत्तर द्याहटवाधन्यवाद साविताताई...
उत्तर द्याहटवाहो खरंय तुमचं... आणि थोडा विचार केल्यावर असंही वाटलं की चांगल्याची फक्त जगाकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वत:पासूनच सुरुवात करायला हवी... इथून पुढे निदान मी तरी फक्त बघ्याची भूमिका घेणार नाही....
All is not over YET :)
बोचरी आणि वास्तववादी कविता...
उत्तर द्याहटवाकधी संपणार हे सगळं....... :(
उत्तर द्याहटवा