माझ्या लहानपणी आमच्याकडे टी.व्ही. नव्हता. मी आणि माझ्यासारखे बरेच जण शेजाऱ्यांकडे जाऊन टी.व्ही. पाहायचे. तेव्हा ज्यांच्याकडे असायचा त्यांच्याकडेही लाकडी खोक्याचा शटरवाला Black-N-White टी.व्ही. असायचा. शनिवारी आणि रविवारी हिंदी चित्रपट लागायचे. एखाद्या दिवशी अमिताभ बच्चनचा चित्रपट असला की सगळे म्हणायचे "आज टी.व्ही. ला छान पिक्चर आहे" मग तो "पिक्चर" पहायची उत्सुकता असायची. पण मला त्याही पेक्षा जास्त उत्सुकता असायची ती त्या चित्रपटाआधी १० मिनिटे लागणाऱ्या जाहिरातींची!
आमचे शेजारी टी.व्ही. लावून ठेवायचे आणि मी माझ्यासारखे अजून काही जाहिरातवेडे आवडीने जाहीराती बघत बसलेले असायचे. "दिपिकाजी आयीये आयीये, ये लीजिये आपका सब सामान तय्यार... ये नाही वो......" काय मजा वाटायची निरमाची ही ad पाहताना... "धारा धारा शुद्ध धारा" सुरु झाले की आपणही त्याबरोबर गावेसे वाटायचे... "बुलंद भारत कि बुलंद तस्वीर....." लागले की आमचेही मन बुलंद व्हायचे... दूरदर्शनची विविध क्रीडापटू मशाल घेऊन धावायचे ती जाहिरात केवळ अप्रतिम... cadbury ची "कुछ खास है हम सभीमे" म्हणत क्रिकेट ग्राउंड वर गार्डला न जुमानता एक युवती नाचत धावत यायची... सर्फ ची जुनी जाहिरात आधा किलो सर्फ एक के बराबर म्हणत अगदी बाटल्या भरून वगैरे दाखवणे, "दाम" कम्पेअर करणे आणि जाहिरातीत नसणाऱ्या तिसऱ्या व्यक्तींनी गृहिणीशी बोलणे, सगळंच छान वाटायचं..... विको च्या जाहिराती तर अजूनही प्रभातला मराठी चित्रपटाआधी पाहायला मिळतात तेव्हा एकदम Nostalgic व्हायला होतं.... लक्स च्या जाहिरातीत अजूनही माधुरीलाच पाहावंसं वाटतं... लहानपणी अंघोळीचा साबण म्हणजे बाबांसाठी लाईफबॉय आणि आमच्यासाठी लक्स वाटायचा. चोकलेट म्हणजे cadbury वाटायचे, दंतमंजन म्हणजे विको आणि टूथपेस्ट म्हणजे कोलगेट वाटायचे, चहा म्हणजे रेड लेबल आणि शाम्पू म्हणजे क्लिनिक प्लस!
त्या तुलनेत हल्लीच्या जाहिराती म्हणजे नुसताच दंगा वाटतो... त्यातून इतर जाहिरातींचे मराठी भाषांतर म्हणजे तर अगदी धन्यवाद. ओठांची हालचाल जुळवण्यासाठी की यांचं मराठीचं ज्ञानच तेवढं माहिती नाही पण कानांना काहीच्या काही सहन करावं लागतं. आहेत आताही काही जाहिराती चांगल्या, पण काहींची मजा एकदा पाहिल्यानंतरच निघून जाते. खरंच जुनं ते सोनं हे वाक्य मला जाहिरातींच्या बाबतीत तरी नक्कीच म्हणावसं वाटतं....
वाह मस्त... अश्या अनेक जाहिराती मनात तश्याच घर करून आहेत. अमूल, कॅडबरी,जलेबी (धारा), फेविकॉल, बजाज...किती तरी उदाहरणे देता येतील :)
उत्तर द्याहटवासगळ्या डाऊनलोड करून ठेवल्या आहेत. जेव्हा मुड होतो बघत बसतो :)
ho ga khup mast sagalya junya jahirahi athavalya :)
उत्तर द्याहटवासुहास, धन्यु फॉर फास्ट रिप्लाय...... :) खरंच मी ही ठेवल्या आहेत dl करून... मजा वाटते त्या जाहिराती पाहताना....
उत्तर द्याहटवानिवी हो ना... मला त्या tv days साठी तरी परत लहान व्हावंसं वाटतं... :)
उत्तर द्याहटवाold is gold.. :):)
उत्तर द्याहटवाVaishu, yes indeed ... :)
उत्तर द्याहटवाधारा ची "जलेबी", आणि कॅड्बेरी च्या जाहिराती अजुन ही मला फार आवडतात...! आणि "हमारा बजाज" हे गानं अजूनही कधी कधी मनात डोकावत राहतं... :)
उत्तर द्याहटवाजून्या जाहिराती ( आठवणी ) जाग्या झाल्या :)
उत्तर द्याहटवाFerrero Sam आणि Unique Poet ! ब्लॉगवर हार्दिक स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :) खरंच जुन्या जाहिराती किती सुंदर होत्या ना....
उत्तर द्याहटवा>>आमचे शेजारी टी.व्ही. लावून ठेवायचे
उत्तर द्याहटवाआमचे पण शेजारी असच वागायचे...मला बजाज ची जाहिरात सर्वात जास्त आवडायची अन ती साक्षरता अभियानाची ती पण मस्तच होती.
योगेश, खरंच जाहिरातींसारखेच शेजारीही खूप चांगले होते तेव्हा... :)
उत्तर द्याहटवासाक्षरता अभियान पूरब से सूर्य उगा.... सुंदर गाणे... बहुतेकांना अशोकजींचे मेलडी संगीत
जुन्या जाहिराती म्हणजे खूपच भारी होत्या. नाहीतर आताच्या जाहिरातीना ती जुनी सर येत नाही..
उत्तर द्याहटवाखरंय भारत... जुन्या जाहिराती एकदम भारी होत्या....
उत्तर द्याहटवाJalebi add keli var :)
उत्तर द्याहटवालहानपण देगा देवा..मुंगी साखरेचा रवा..
उत्तर द्याहटवाSSVC ब्लोगवर स्वागत, आणि कामेंत्बद्दल धन्यवाद :)
उत्तर द्याहटवाअगदी खरंय..
ओय... लई भारी....!
उत्तर द्याहटवाखूप वाटलं गं तुझे लेख वाचून... धम्माल आहेस... पण त्याबरोबरच किती विवेचनात्मक लिहितेस....!
खूप धन्यवाद चैताली, तुमच्या कविता खूप सुंदर आहेत...
उत्तर द्याहटवाआणि ये ना तू सख्या गाणे तर अप्रतिम....
ब्लोगवर स्वागत :)
+१००...मला वाटते आजच्या(म्हणजे उद्या तरुण होणार्या) पिढीला असे 'नॉस्टॅल्जिक' वाटण्यासारखे काही आहे की नाही ?
उत्तर द्याहटवाआपण खरे नशीबवान...
सागर, ब्लॉगवर हार्दिक स्वागत :)
उत्तर द्याहटवाअगदी खरंय, ही पिढी बहुदा आमच्या वेळी मोबाईल मध्ये ही एप्स नव्हती अशा प्रकारे नॉस्टॅल्जिक होईल कदाचित....