रविवारी सुटीचा दिवस म्हणून माझे दोन छोटे दोस्त साक्षी आणि साई माझ्याबरोबर खेळायला घरी आलेले. ही दोघे चुलत भावंडं. वय साधारण साडेतीन चार वर्षांच्या आसपास असेल दोघांचंही. त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जातो कळत नाही. साक्षीकडे गोष्टींचं पुस्तक होतं, त्यात बऱ्याच प्राण्यांची पक्ष्यांची चित्रे होती. त्यांच्याशी त्यातल्या गोष्टींबद्दल बोलताना साई म्हणाला,
"आम्ही हे प्राणी पाहायला बागेत जाणारे".
मीही त्याला सहज म्हणाले,
"तुम्ही बागेत जाणार तर मला पण न्या ना..."
साई थोडा विचार करून...
"अगं पण आमच्याकडे तर दोनच गाड्या आहेत. एका गाडीवर मी, आई आणि बाबा आणि दुसऱ्या गाडीवर साक्षी, काका आणि काकू. मग तू कुठे बसणार? आम्ही नाही नेणार तुला...."
मग मी हाताच्या मुठी वळवून त्या डोळ्यांसमोर फिरवत म्हणाले,
"उं उं उं मला नेणार नाही तुम्ही? मग मी रडणार..."
साईचा इवलासा चेहरा अजूनही विचारातच दिसत होता...
तेवढ्यात साक्षी माझा हात बाजूला करत म्हणाली,
"ताई तू रडू नकोस, मी थोड्याच जागेवर बसेन, मम्माला पण थोड्याच जागेवर बसायला सांगू... मग तुला बसायला जागा होईल आणि तुला पण नेऊ, पण तू रडू नकोस...."
तेव्हा वाटलं... उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional असतात का?

>>उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional असतात का?
उत्तर द्याहटवाबहुतेक असच वाटतय... माईंच म्हणजे सिंधुताईंनी सांगितलेल एक उदाहरण आठवत....घरी पाहुणे आलेत अन नेमक त्यावेळी लक्षात येत की दुध अन साखर संपली आहे....अन त्यावेळी जर मुलाला दुध अन साखर आणायला सांगितल तर मुलगा पाहुण्यांसमोर दुधाच भांड मिरवत घेउन जातो अन परत येतानाही तसाच येतो याउलट मुलीला सांगितल तर ती पाहुण्यांच्या नकळत गुपचुप भांड लपवुन जाते अन येते पण तशीच...हा मुळ फ़रक आहे.
उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional असतात का? . .
उत्तर द्याहटवानाही वाटत असं. लहान मुलं उपजत आरपार पारदर्शक असतात. फ़क्त आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्यांची वागणूक ’घडते’. उपजत काही गुण येतात; नाही असं नाही, पण एखादा मुलगा इमोशनल असलेल्या आईचा आदर्श पुढे ठेवत असेल, तर तो ही इमोशनल बनतो.
शिवाय; हे वाक्य तरूणपणात उल्टं केलं (मुलं = एमोशनल आणि व्हाइस व्हर्सा), तरीही चपखल बसेल, नाही का? :)
मेन आर फ़्रॊम मार्स वीमेन आर फ़्रॊम व्हीनस ते हेच. हॊर्मोन्स दुसरं काही नाही. माझ्या मते ’हे’ उपजत असतं :)
योगेशजी खरंच.. मुलींमध्ये उपजत शहाणपण, सहनशक्ती आणि समंजसपणा असतो बहुदा.. पण वयाप्रमाणे किंवा त्या कोणत्या वातावरणात वाढतात त्यानुसार नंतर या गोष्टी बदलत असाव्यात...
उत्तर द्याहटवापंत, आपण जाणते झाल्यानंतर वेळेनुसार कधी practical व्हायचं आणि कधी emotional ते ठरवतो... तेव्हा gender factor नसतो.... :)
उत्तर द्याहटवाआणि टेक्निकली तर तुम्ही सांगितलंय ते असणारच...
घरी पाहुणे आलेत अन नेमक त्यावेळी लक्षात येत की दुध अन साखर संपली आहे....अन त्यावेळी जर मुलाला दुध अन साखर आणायला सांगितल तर मुलगा पाहुण्यांसमोर दुधाच भांड मिरवत घेउन जातो अन परत येतानाही तसाच येतो याउलट मुलीला सांगितल तर ती पाहुण्यांच्या नकळत गुपचुप भांड लपवुन जाते अन येते पण तशीच...>>>
उत्तर द्याहटवाकिती अचूक निरीक्षण आहे....
खरंय पियू.... एकदम अचूक निरीक्षण..... :)
उत्तर द्याहटवा