चैत्राने बघ दिली पालवी
तरुवर वेलींना...
नभानेही दिधला मृद्गंध
या अतुष्ट धरणीला...
तूही आता
सोड अबोला
अन दर्शन दे नयनांस...
आता तुझीच जीवा रे आस....
आम्र मोहरता
कोकीळ भुलले ...
मेघ दाटता
मयूरही फुलले...
तुलाच कसे ना
काहीच रीझवे
करिसी मज का उदास...
आता तुझीच जीवा रे आस....
मज विरह का
चातकापरी...
सोड रुसवा हा
कशास दूरी...
तव स्पर्शाने
गंधित वारा
बिलगु दे अंगास...
आता तुझीच जीवा रे आस...
छायाचित्र आंतरजालावरून |
चैत्राने बघ दिली पालवी
तरुवर वेलींना...
नभानेही दिधला मृद्गंध
या अतुष्ट धरणीला...
तूही आता
सोड अबोला
अन दर्शन दे नयनांस...
आता तुझीच जीवा रे आस....
आम्र मोहरता
कोकीळ भुलले ...
मेघ दाटता
मयूरही फुलले...
तुलाच कसे ना
काहीच रीझवे
करिसी मज का उदास...
आता तुझीच जीवा रे आस....
मज विरह का
चातकापरी...
सोड रुसवा हा
कशास दूरी...
तव स्पर्शाने
गंधित वारा
बिलगु दे अंगास...
आता तुझीच जीवा रे आस...
:) छान !
उत्तर द्याहटवातव स्पर्शाने
उत्तर द्याहटवागंधित वारा
बिलगु दे अंगास...
सुंदर!! खूप छान......
BinaryBandya™ खूप धन्यवाद.... :)
उत्तर द्याहटवाअनघा ताई, ब्लोगवर मन:पूर्वक स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल खूप आभार... :)
उत्तर द्याहटवादीपक, खूप खूप आभार :)
उत्तर द्याहटवाsurekh, mast ahe.
उत्तर द्याहटवावाह मस्त... !!
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद धीरज आणि सुहास.... :)
उत्तर द्याहटवा1 number........
उत्तर द्याहटवाThank you Amar.... :)
उत्तर द्याहटवा