बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

कविता... (कविता)

कविता करायची म्हटलं कि
सगळे शब्द पळून जातात...
एखाद्या निवांत क्षणी मात्र
आपण होऊनच जमा होतात...


विषय आठवावा म्हटलं कि
त्यावेळी काहीच सुचत नाही...
अचानकच मग कधीतरी
अनेक गोष्टी एकदम स्फुरतात...


आपण जुळवू म्हटलं कि
यमकच  जुळत नाही...
शब्दांच्या कलाने घेतलं कि
ते आपोआपच कागदावर उतरतात...


अक्षराला अक्षर जुळतं
आपलं आपल्यालाच छान  वाटतं...
फुलांनी भरलेल्या बागेसारखी
मनात शब्दांची दाटी होते...


मग हा शब्द घेऊ कि तो घेऊ?
सगळेच शब्द सुंदर वाटतात...
मनातल्या भावनांना वाट मिळते
अशाच का कविता तयार होतात?






४ टिप्पण्या: