नाव: ऋचा दिलीप महामुनी
जन्मतारीख/वेळ: ---
आईचे नाव: ---
वडिलांचे नाव: ---
जात: ---
उपजात: ----
गोत्र: ---
रास: ---
शिक्षण: ---
नोकरी: IT Professional
पगार: ६५,०००/- p.m
.
.
.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
ऋचाला आज ऑफिसमधून लवकर घरी जायचं होतं. आज पुन्हा एका नवीन 'स्थळा'ला भेट द्यायची होती. फोनाफोनी होऊन 'बघायचा' कार्यक्रम ऋचाच्याच घरी ठरला होता. कसंतरी काम संपवून एक बस आणि पुढे रिक्षा करत धावतपळत तिने घर गाठलं. ठरलेल्या वेळेच्या जेमतेम १५-२० मिनिटं आधी ती घरी पोहोचली. घर आवरायची वगैरे तयारी दादांनी आणि निमिषाने करून ठेवलेली आणि नाश्त्याची आईने! पोहोचल्याबरोबर पटकन ती तयार झाली. संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि दादांचा फोन वाजला. पाहुणे जवळच्या चौकात आले होते, आता तिथे त्यांना घरापर्यंत आणण्यासाठी जायचं होतं. दादा त्यांना घेऊन येण्यासाठी गेले आणि पाचेक मिनिटात आलेच घरी.
"या, या, बसा. पाणी घ्या." दादांनी पाण्याचे ग्लास पुढे केले.
मुलगा, त्याची आई आणि बाबा स्थानापन्न झाले.
म्हणायची पद्धत म्हणून मुलगा म्हणायचं. नाहीतर वय वर्षे ३४ असलेला इसम मुलगा या गटात आजिबातच बसणारा नव्हता. आई दादा आणि त्या दोघांचं जुजबी बोलणं झाल्यावर निमिषा ऋचासाठी बाहेर येण्याचा निरोप घेऊन किचन मध्ये आली.
"बराय का?" ऋचाने विचारलं.
"बराय, फोटोत आहे तसाच आहे, फक्त फोटो पासपोर्ट साईझ होता म्हणून पोट नव्हतं दिसत त्यात!". निमिषा उत्तरली.
ऋचा नाश्ता घेऊन बाहेर आली. सगळ्यांना एक एक डिश देऊन ती परत आत गेली.
"कसा वाटला?" - निमिषा.
"बराय" - ऋचा. "मी तरी कुठे अप्सरा लागून गेलीये, आणि आता २८ च्या पुढे माझंच वय गेल्यावर काय अपेक्षा ठेवायच्या?"
चहा घेऊन ऋचा परत बाहेर आली.
Hobbies काय आहेत, किती वर्ष नोकरी करते, पगार किती आहे, कामाची पद्धत काय आहे, सुटी कधी असते असं नेहमीचं बोलणं झालं. बोलायला सगळे मोकळेढाकळे वाटले. बोलून झाल्यावर मि. सत्येन पारखी आणि त्याच्या आई वडिलांनी सर्वांचा निरोप घेतला. २-४ दिवसांत आमचा निर्णय कळवू म्हणाले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
"ताई, काय करणारेस त्या सत्येन पारखीचं?" - निमिषा
"काय करू? मला तसाही फार choice राहिला नाहीये, माझ्यानंतर परत तुझं लग्न व्हायचंय अजून."
"हम्म, पण म्हणून कोणालाही हो म्हणशील?"
"नाही गं, बराच आहे की सत्येन. Database Admin ची पोस्ट आहे, साठ हजार रुपये पगार आहे, पुण्यासारख्या ठिकाणी स्वत:चा flat, चारचाकी गाडी आहे. अजून काय हवं? आता वयात आहे सहा वर्षांचा फरक पण कुठेतरी Compromise तर करावंच लागणार ना." - ऋचा
"अगं पण तुला click झाला का तो? मला नाही वाटलं तसं."
"वेडी आहेस, लहान आहेस अजून तू. असं कोणी कोणाला click वगैरे होत नसतं. ते फक्त प्रेमात पडलेल्यांना होतं. किंवा मग ज्या मुलीच्या घरी श्रीमंती असेल आणि ती दिसायला सुंदर वगैरे असेल तर मग मुलं पण तशीच येतात सांगून. मला माहितीये माझ्या बाबतीत clicking वगैरे काही होणार नाहीये."
"मला फार काही कळत नाही ताई, पण स्वत:च्या अगदीच मनाविरुद्ध निर्णय घेऊ नकोस इतकंच सांगेन." - निमिषाला अजून अनुभव नव्हता काहीच पण काळजी स्पष्ट दिसली तिच्या डोळ्यांत.
"तू नको काळजी करूस, होईल ठीक सगळं."

संध्याकाळच्या वेळी दादांचा फोन खणाणला.
"नमस्कार, मी मिसेस पारखी."
"हो नमस्कार, बोला ताई."
"आम्ही आमच्या गुरुजींकडे ऋचा आणि सत्येनची पत्रिका दाखवून आलो, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पत्रिका उत्तम जमतेय हो. आमच्याकडून होकार आहे."
"अरे वा वा, फारच छान, अहो पण ऋचाशी आमचं तसं काही बोलणं झालं नाही अजून, ती घरी आली की घेतो मी बोलून तिच्याशी. सॉरी हं, पण तिलाही सध्या ऑफिसमध्ये workload जास्त असल्याने राहून गेलं बोलायचं" - इति दादा.
"अहो काहीच हरकत नाही, मुलांनाही हवा तितका वेळ द्यायला पाहीजे नं विचार करायला, आपल्या वेळेसारखं नाही राहिलं हो हल्ली!" - मिसेस पारखी
"बरं बरं, उद्या दुपारपर्यंत मी कळवेनच तुम्हाला काय असेल ते."
"अगदी, ठेवू मग फोन, अच्छा!"
"अच्छा!"

ऋचा आणि सत्येनचं एकदा बाहेर भेटणं झालं. दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणी होत एक बैठकीचा दिवस ठरला. शनिवार-रविवार पारखींना जमणार नसल्याने पुन्हा अधला मधलाच दिवस ठरला. सत्येनला येणं शक्य नव्हतं. ऋचाला मात्र थोडं लवकर यावं लागणार होतं. ठरल्याप्रमाणे ऋचा तिच्या वेळेत घरी आली. पाहते तर घरी तिच्याकडचे सोडून कोणीच नाही. आईने सांगितलं की बैठक झाली. साधारण एक-दीड महिन्याने साखरपुडा आणि सहा महिन्यांनी लग्न असं ठरलंय. देण्याघेण्याचं ते लोक आत्ता तरी आम्हाला काही नको म्हणालेत. सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला पण एक शंका वाटतेय की त्यांच्याकडून मुलाचे आई-वडिल सोडून दुसरा एकही नातेवाईक आला नाही. ऋचाने या सगळ्यावर फार विचार केला नाही.

"हाय, रस्ता सापडायला काही त्रास झाला नाही ना." - ऋचा
"छे, मुळीच नाही. अगदीच सोपा होता रस्ता यायला." - सत्येन
आज पुन्हा एकदा दोघे बाहेर भेटत होते. ऋचाच्या ऑफिसजवळच्याच restaurant मध्ये भेट ठरली होती. रात्री ८-८.३० ची वेळ होती, तरी दोघांचं south Indian वर भागवू असं ठरलं. इकडच्या तिकडच्या गप्पा होता होता सत्येनने तिला तिचा कोणी खास मित्र आहे का म्हणून विचारलं. तसं कोणी नव्हतंच. ऋचानेही मग तोच प्रश्न त्याला केला.
"हो तशी आहे, मोनिका तिचं नाव, तिचं लग्न झालेलं आहे. पण जेव्हा आयुष्यात काही वेगळं घडतं किंवा एखाद्या सल्ल्याची गरज पडते तेव्हा तेव्हा मी तिच्याशी बोलतो." - सत्येन म्हणाला.
"इतकंच असेल तर हरकत नाही." ऋचाला तितकी मैत्री फार आक्षेपार्ह वाटली नाही.
"बाय द वे, माझा पत्रिका वगैरे गोष्टींवर विश्वास आहे. मला स्वत:ला थोडंफार समजतं आणि सध्या एका गुरुजींकडे शिकतो सुद्धा आहे."
"अरे वा, फारच छान, पण माझा नाहीये तितकासा विश्वास या सगळ्यावर. म्हणजे शास्त्र म्हणून आहे. पण जन्मवेळच चुकली किंवा ज्यांना पत्रिका दाखवतोय त्यांचा अभ्यास तितका नसला तर काहीच अर्थ नाही या सगळ्याला" ऋचाने तिचं मत व्यक्त केलं.
"असो, पण तुला मात्र मी तुझी पत्रिका पाहूनच होकार दिला. तुझ्या पत्रिकेवरून असं दिसतं की तुझा स्वभाव खूप चांगला आहे." - सत्येन
आज दोघेही एकमेकांशी जरा खुलून बोलले होते.
सत्येनने त्याची चारचाकी आणली होती आणि जाता जाता तो ऋचाला तिच्या घरी सोडवणार होता. सत्येनने बिल भरलं आणि दोघे निघाले. तिथून घर तसं तासाभराच्या तरी अंतरावर होतं. पहिली दहा मिनिटं तरी शांततेतच गेली. ती गोष्ट बोलावी की नाही याचाच ऋचा विचार करत होती. काय विचार झाला ते तिला समजलं नाही पण तोंडातून शब्द बाहेर पडू लागले.
"माझ्या घरी माझी बहीण आणि मी दोघीच आहोत. आमचं घर थोडंफार माझ्या आर्थिक support वर अवलंबून असेल. म्हणजे दर महिन्यालाच असं नाही पण कधी काही emergency असेल तेव्हा. मी त्यावेळी माझ्या घरच्यांना मदत करू शकते ना ?" - ऋचा काय बोलली ते अजिबात विचार न करता बोलली पण मनातलं होतं सगळं आणि सत्येनच्या प्रतिक्रियेची ती वाट पाहू लागली.
"ठीक आहे, चालेल." - सत्येन
ऋचाला हायसं वाटलं.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
"माफ करा, अचानक बोलावलं तुम्हाला, पण काही गोष्टी बोलायच्या होत्या." - सत्येनचे बाबा
"हो बोला ना, काही साखरपुड्याची तारीख वगैरे पाहिलीत का तुम्ही?" - दादा
"ते पाहूच हो, महिन्याला पंधरा वीस मुहूर्त चालू आहेत सध्या. तुमची मुलगी परवा म्हणत होती ती लग्नानंतरदेखील तुमच्याकडे बघणार म्हणून."
"अहो.... " - दादा, त्यांना मध्येच तोडत पुन्हा पारखी - "आमच्या मुलीचं लग्न होऊन तीन वर्षं झाली, पण फक्त एकदा येऊन गेली इथे ती. एकदा लग्न झाल्यावर माहेराशी संबंध आम्हाला चालणार नाहीत. आम्हीही आतापर्यंत फक्त दोन वेळा जाऊन आलो तिच्याकडे. आतादेखील पाहिलंत ना, इतकं भावाच्या लग्नाचं ठरत आलंय पण ती दिसली तुम्हाला एकदा तरी? तुमची मुलगी म्हणत होती नंतरदेखील ती तुम्हाला आधार देणार, ते आम्हाला पटलं नाही. एकदा लग्न झालं की तिच्यावर पूर्ण हक्क सासरकडच्यांचा आहे."
"तुम्हाला काय म्हणायचंय ते समजलं, निघतो आम्ही." - दादा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
ऋचाने तिचा biodata आज update केला.
नाव: ऋचा दिलीप महामुनी
जन्मतारीख/वेळ: ---
आईचे नाव: ---
वडिलांचे नाव: ---
जात: ---
उपजात: ----
गोत्र: ---
रास: ---
शिक्षण: ---
नोकरी: IT Professional
पगार: ५०,०००/- p.m.
.
.
.