बुधवार, २५ एप्रिल, २०१२

संस्कार?

           
            शेजारच्या काकू रविवारी आईशी गप्पा मारायला आल्या होत्या. त्यांना गप्पांना काही विषयच लागत नाही. आणि सगळेच विषय संपले तर अमक्याच्या घरी असं असं झालं, याचं त्याच्याशी भांडण झालं, या एखाद्याच्या घरातल्या अगदी वैयक्तिक गोष्टीही त्यांना माहिती असतात. असंच बोलता बोलता त्यांनी सांगितलं की "त्या कल्पनाची मुलगी आहे ना, तिने अमक्या अमक्या जातीच्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं. तसेही तिच्यावर काही संस्कार आहेत असं कधी वाटतच नव्हतं."
तेव्हा मनात आलं, संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

            पूर्वी म्हणत मुलीच्या जातीने शांत असावं, चार लोकात मोठ्याने हसू नये, अशी मुलगी असली की तिच्यावर चांगले संस्कार आहेत, पण एखादी अशी असली आणि तिचा स्वभावच चांगला नसेल तर फक्त वरवरच्या वागण्याला संस्कार म्हणायचं का? पळून जाऊन किंवा घरच्यांविरुद्ध लग्न केलं तर संस्कार नसतात का? ती जर आयुष्यभर सुखी राहणार असेल तर काय बिघडलंय?

            एखादा मुलगा व्यसनाधीन असेल पण कोणाच्याही मदतीला कधीही धाऊन जाणार असेल तर त्याच्यावर संस्कार आहेत की नाहीत? संस्कार म्हणजे फक्त बाह्यवर्तन, प्रत्येक गोष्टीचं अवडंबर की माणुसकी म्हणजे संस्कार? की माणुसकी हा संस्कारातला फक्त एक प्रकार?

            खोटं बोलू नये हा संस्कार, पण प्रत्येकाला आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खोटं बोलावंच लागतं, मग काय उपयोग या संस्काराचा? मोठ्यांचा आदर करावा, पण ती व्यक्ती आदर करण्यालायक नसेलच तर? अंगी नम्रपणा असावा, पण नम्र लोकांना भित्रे समजतात आजकाल! अरेला कारे बोलला नाही तर कसा तग धरेल? मग आधी उद्धटपणा करायचा आणि जर आयुष्यात काही चांगलं नाव कमावलं, प्रसिद्धी मिळाली तर नंतर नम्र व्हायचं? अजून कितीतरी गोष्टी ज्या आपल्यावर लहानपणापासून बिंबवल्या जातात, पण प्रत्यक्ष जगात तसं वागून चालतच नाही. चाणक्याने सांगितलंय, "सरळ झाडे आधी कापली जातात".

            संस्कार आपल्याला "माणूस" बनवतात. आणि आपल्यातला माणूस आपल्याला माहिती असेल तर इतरांनी आपल्या संस्कारांबद्दल काहीही बोलो, काय फरक पडतोय!

१४ टिप्पण्या:

 1. चाणक्य फार लहानपणापासून हुशार होता...
  खाली संस्कारांबद्दल काही (अनाकलनीय) माहिती आहे
  http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. अगदी सहमत इंद्रधनू... आणि
  "संस्कार आपल्याला "माणूस" बनवतात. आणि आपल्यातला माणूस आपल्याला माहिती असेल तर इतरांनी आपल्या संस्कारांबद्दल काहीही बोलो, काय फरक पडतोय!" >> You nailed it....
  :))

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. अभिषेक, (अनाकलनीय) माहिती बद्दल धन्यवाद :)
  बाकी चाणक्याबद्दल मी काय बोलावे...
  प्रतिक्रियेबद्दल आभार :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. @Me,
  प्रतिक्रियेसाठी अनेक धन्यवाद :)
  कित्येक जण संस्कारांचा माणूस होण्यासाठी उपयोग न करून घेता, असं वागलं नाही तर लोक काय म्हणतील यासाठी वापर करतात तेव्हा वाईट वाटतं...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. Pu.la.deshpande yache sanskar ya vishayavarcha lekh vacha. Ek shunya mi ya pustakat ahe.

  Tumachya sagalya prashnanchi uttare miltil.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. Anonymous, मला वाटतंय तुम्ही हा लेख म्हणत आहात...
  http://cooldeepak.blogspot.in/2007/04/blog-post.html
  प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. ekdum mast.........
  वरवरच्या वागण्याला संस्कार म्हणायचं का?
  ..servana mahit asate pan manavirudhha vagale ki sanskar nahit..tyamulech
  आधी उद्धटपणा करायचा आणि जर आयुष्यात काही चांगलं नाव कमावलं, प्रसिद्धी मिळाली तर नंतर नम्र व्हायचं?...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 8. धन्यवाद अमर :)
  हो खरंय, आपण समाजाच्या मनाविरुद्ध वागलो की आपल्यावर संस्कार नसतात...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 9. खरंय... समाजमनाविरुद्ध वागलं तर लगेच संस्कार नाहीत असं म्हटलं जातं..ख्ररं बोललीस...!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 10. >> समाजमनाविरुद्ध
  एकदम योग्य शब्द....
  धन्यवाद चैताली :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 11. Interesting topic..
  House ह्या सिरियलमध्ये एकदा एक ऑटिस्टिक मुलगा पेशंट म्हणून येतो. तेव्हा हाऊस त्याच्याकडे पाहून म्हणतो -
  >>Why would you feel sorry for someone that gets to opt out of the inane courteous formalities which are utterly meaningless, insincere and therefore degrading. Imagine how liberating it would be to live a life free of all the mind numbing social niceties. I don't pity this kid - I envy him.

  नुसते बाह्य संस्कार ह्याच पातळीवर उरतात कधीकधी..

  प्रत्युत्तर द्याहटवा
 12. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद विद्याधरजी,

  House मधला प्रसंग आवडला. एकदम चपखल उदाहरण आहे हे.
  खरंच बाह्यसंस्कर करतानाच माणूस घडणं फार महत्त्वाचं आहे....

  प्रत्युत्तर द्याहटवा