बुधवार, ११ एप्रिल, २०१२

खूप बोर होतं तेव्हा...

हल्ली उन्हाळ्यात दुपारी जेवल्यानंतर जाम म्हणजे जाम झोप येते. मग ऑफिसमध्ये असो वा घरी. असंच त्या दिवशी पण खूप झोप येत होती. प्रचंड फ्रीक्वेन्सीने जांभया येत होत्या. पण आम्हाला वाटलं आम्हाला बोरच होतंय. १०-१२ जांभया दोघींच्याही झाल्यावर मग शेवटी संवाद सुरु केला.

ती : मला खूप झोप येतेय.  |-)

मी: मला पण खूप झोप येतेय, कारण आधी मीच जांभई दिली ना...  :-P

ती: झोपेचा आणि जांभईचा  काही संबंध नसतो, जांभई ऑक्सिजन कमी पडल्याने येते. :s 

मी: मग तुला कशावरून झोप आलीये, तुलाही  ऑक्सिजन कमी पडत असेल.  :-\

ती: नाही मला झोप आलीये, तुला ऑक्सिजन कमी पडतोय. :-) 

मी: हम्म, बॉसला सांगायला पाहिजे, तुमच्या हापिसात ऑक्सिजन कमी पडतोय. इथे वर ऑक्सिजन मास्क्स ठेवा, जो ऑक्सिजन कमी पडला की खाली येईल, मग जांभया नाही येणार. :D

ती: गुड आयडिया, किंवा मग इथे छोट्या छोट्या रोपांच्या कुंड्या ठेवायला पाहिजेत टेबलच्या आजूबाजूला. म्हणजे पुरेसा ऑक्सिजन मिळेल. :-o

अजून एक जण तेवढ्यात आमचा "संवाद" ऐकायला आली होती, ती हसायलाच लागली अचानक. आणि म्हणे कुंडी म्हणजे काय माहितीये न... आम्ही : हो हो माहितीये, तुला तर तेच आठवतं कधीपण... ती लगेच गेली (आमच्यासारखी रिकामटेकडी नव्हती बहुतेक)

मी: हा पण कुंडीची आयडिया भारी आहे. मग आपण बाबा रामदेव सांगतात तसा प्राणायाम करून रोपाच्या जवळ जाऊन फक्त ऑक्सिजन घेऊ आणि कार्बन डाय  ऑक्साइड एका पिशवीत भरून बॉसच्या केबिनमध्ये सोडून येऊ...  :-#

दोघी: खी खी खी   :D  :D  :D

चला चहा आला... आता भरपूर ऑक्सिजन मिळेल....  8o|   <:o)

------------------------------------------

(कोण म्हणतंय तुम्हाला बोर झालं होतं तर आम्हाला कशाला बोर केलंस ते? मला बोर होत असताना सर्वांना ते वाटण्याचा मला पूर्ण हक्क आहे :-P  )

२२ टिप्पण्या:

  1. "जांभई ऑक्सिजन कमी पडल्याने येते" >> चांगला शोध आहे

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद अभिषेक :)
    शोध हम्म चांगला आहे पण फार पूर्वी लागला आहे :)
    http://en.wikipedia.org/wiki/Yawn

    उत्तर द्याहटवा
  3. oh really!
    then second part of following comment from same article must be read carefully
    "One study states that yawning occurs when one's blood contains increased amounts of carbon dioxide and therefore becomes in need of the influx of oxygen (or expulsion of carbon dioxide) that a yawn can provide,[5] but studies have since shown it to be either incorrect or, at the very best, flawed.[7] Yawning may in fact reduce oxygen intake compared to normal respiration, not increase it"

    उत्तर द्याहटवा
  4. First part also should read carefully, cause second says that yawning doesn't increase oxygen, its not saying anything about reason of yawning. Still I don't know the exact scientific reason. U might be right

    उत्तर द्याहटवा
  5. Typical girls,
    मुद्दा पटला तरी सोडायचा मात्र नाही...

    as the first part says
    One study states that yawning occurs when one's blood contains increased amounts of carbon dioxide and therefore becomes in need of the influx of oxygen (or expulsion of carbon dioxide) that a yawn can provide,
    Seconds explains
    [5] but studies have since shown it to be either incorrect or, at the very best, flawed.
    About the third, it is explanatory to the 2nd..
    Yawning may in fact reduce oxygen intake compared to normal respiration, not increase it"

    typical girls :-/

    उत्तर द्याहटवा
  6. मी तर आधीच सांगितलंय मला शास्त्रीय कारण माहिती नाही, तुमचं बरोबरही असेल.
    आणि हे मी जितक्या वेळा वाचतेय तितक्या वेळा मला माझंच बरोबर वाटतंय :P
    असो पण मी तिच्यापर्यंत निरोप पोहोचवेन :)

    उत्तर द्याहटवा
  7. मग आता मी रिप्लाय देईपर्यंत एकतर तुम्ही झोपला असाल किंवा ऑक्सिजन च्या शोधात असाल :P

    उत्तर द्याहटवा
  8. आयन स्टाइन नंतर तुझंच नाव घ्याव लागेल ....................:)))

    उत्तर द्याहटवा
  9. हे हे मंदार, ठीक आहे, मला चालेल आयन स्टाइनचं नाव माझ्या आधी घेतलेलं :P
    खूप धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  10. हेहेहेहे माझ्या बॉसच्या कॅबीन मध्ये पण असाच कार्बनडाय ऑक्साइड सोडवा असं वाटू लागलाय आणि खरंच नवीन शोध अगदी आवडला, प्राची मस्त मस्त लिहिलस आहेस. मला खूप आवडलं कधी कधी मी हा विचार करतोच

    उत्तर द्याहटवा
  11. हा हा हा खरच सोडून ये कल्पेश. धन्स रे कल्पि :)

    उत्तर द्याहटवा
  12. कुंड्या ठेवून नाईट शिफ्ट करू नका म्हणजे झालं ;)

    उत्तर द्याहटवा
  13. @हेरंब, हो रात्री रोपं कार्बनडाय ऑक्साइड सोडतात ना ;)
    ब्लॉगवर तुमचं स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  14. धन्यवाद सचिन :)
    ब्लॉगवर तुमचं स्वागत...

    उत्तर द्याहटवा