गुरुवार, १० मार्च, २०११

स्त्रीस (कविता)

आज एकविसाव्या शतकात
          स्वत:च्या सौंदर्याचा बाजार मांडलायस  तू
          फक्त दिखाव्याच्या जगात अडकलीयेस तू
मिस वर्ल्ड होण्याची स्वप्ने तू पाहतेस
त्यासाठी संस्कारांनाही पाने पुसतेस

         तुझी काया पूर्वी असायची झाकण्यासाठी
         आता धडपडतेस  तू तीच दाखवण्यासाठी
स्त्री-मुक्तीच्या लढ्याची सोंगं करतेस
पण तू तर स्वच्छंदी मुक्ताच आहेस
         आधीही होतीस आणि पुढेही राहशील!

तुझ्याचमुळे रामायण घडलं  नि महाभारतही तुझ्याचमुळे!
        तेव्हापासून तुझं महत्त्व आहे,  तरी म्हणतेस मी बंधनात आहे!
स्वत:लाच इतकं स्वस्त केलंयेस तू
        की shaving क्रीमच्या add मध्येही दिसलीच पाहिजेस  तू
असलंच स्वातंत्र्य हवा होतं का तुला?

बुद्धी शक्तीच्या च्या जोरावर कितीही पुढे जा
पण तुझ्या शालीनतेला विसरू नकोस
समजूतदार होऊन नाती जोड, ती तोडू नकोस
तुझ्या उत्कर्षाआड  येण्याची कोणाचीही हिंमत नाही
पण तूच स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नको

तुला देणगी आहे जिजाऊ बनण्याची,
राणी लक्ष्मी नि देवकी होण्याची
         स्वत:ला घडवतानाच दुसऱ्यांना घडव
         प्रेमाने सगळ्यांशी नातं जडव
तू आहेस म्हणूनच तर विश्व आहे
'आई' ही हाक ऐकण्याची संधी फक्त तुलाच आहे....



१५ टिप्पण्या:

  1. सुंदर !
    आजच्या जगात स्वःताला सिद्ध करण्याच्या धावपळीत स्व:ताला विसरत चाललेल्या स्त्रीचं सुरेख वर्णन केलं आहे!

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम लिहिलंय...
    एक वेगळी बाजूही वाचायला मिळाली त्याचा आनंद वाटला! :)

    उत्तर द्याहटवा
  3. वैशाली, THE PROPHET आणि निवी... खूप खूप धन्यवाद... :)

    उत्तर द्याहटवा
  4. वाह छान आहे कविता. वास्तव चित्रण आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. मुक्त कलंदर धन्यवाद :) आणि प्रथमच ब्लॉगवर आलेल्या सर्वांचे स्वागत.....

    उत्तर द्याहटवा
  6. अगदी हीच मते सीमाताई साखरे (नागपूरच्या स्रीवादी कार्यकर्त्या ) यांनी मांडली होती.(साधारणतः ७-८ वर्षांपूर्वी नागपूर लोकमतच्या स्तंभात; अर्थात अजूनही त्यांची हीच मते असतील), अन्‌ मला पटली होती. शीरिष पै यांनी सुद्धा असाच काहीसा विचार मांडला होता.>> फॅशन शोज़ म्हणजे स्त्रीची गुलामीच.पुरुषांच्या चंगळीसाठी स्वतःचा व्यापार.
    ते सगळे आज आठवली ही कविता वाचून.. छान मांडले आहे.कविता आवडली.स्त्रीस्वातंत्र्याच्या खर्‍या अर्थाचा विचार करायला लावणारी.

    उत्तर द्याहटवा
  7. खरंय संकेत. आभार आणि ब्लॉगवर स्वागत. :)

    उत्तर द्याहटवा