गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

असंच...


                मुसळधार पाऊस कोसळतोय बाहेर. माझं गाणी ऐकता ऐकता काम चालू होतं. पण पाऊस ऐकायचा होता म्हणून गाणी बंद केली. पावसाचा मस्त सरसर सरसर लहान मोठा होत जाणारा आवाज.... मधेच गडगडणारे ढग आणि कडाडणाऱ्या विजा... अंधारलेला आसमंत आणि परिसर... वाटलं आता आपली पाऊसगाणी ऐकावीत.... पण कानाला इअरफोन लावला तर पावसाचा आवाज गुडूप आणि नाही लावावा तर एकेका अशा गाण्याची आठवण येतेय की ते अशा पावसात ऐकायलाच हवं... पण काय करणार हापिसात आहे ना मी.... कान पावसासाठी ठेवून मोठ्याने गाणी लावू शकत नाहीये :(  त्यातल्या त्यात इअरफोन एकाच कानाला लावून दुसऱ्या कानाने पाऊस ऐकते आहे. बरं झालं देवा दोन कान दिलेस ते.....

             खिडकी उघडताच एसीच्या हवेपेक्षा खूपच आल्हाददायक गार हवेचा झोत आत आला. बाहेर नजर टाकली तर वाऱ्याच्या शिळेला साद देत झाडं चिंब भिजत त्यावर डोलत होती, पारव्यांचे थवे मस्त भिजून इथल्या इमारतीच्या आश्रयाला आलेले; ते ही जोडीजोडीनेच, आधीच पावसानेच साचलेल्या पाण्यात थेंबांचं नक्षीकाम चाललेलं... एका थेंबाने पडून स्वत:भोवती रिंगण तयार केलं लगेच शेजारी दुसरा थेंब आला, त्याने स्वत:चं वेगळं रिंगण तयार केलं पण दोन रिंगणं पाहता पाहता कधी एकमेकांत मिसळून गेली समजलंही नाही... रस्ते नद्या झालेले, चहाच्या नद्या.... चहा...? हो चहा तर हवाच अशा मस्त पावसात... लगेच चहाही आला... थोड्या तडजोडीने का होईना सगळंच तर झालं मनासारखं... कमी राहिली ती एकच... सोबतीला फक्त तू हवा होतास...
            

२४ टिप्पण्या:

  1. तुमच्या ऑफीसाला काय कुलूप लावलं होत का बाहेरून! मस्त जायचं, भिजायचं... इअरफोन की आस असलेल्या त्या कानांना आपलाच आवाज ऐकवायचा! (बाकी हे सगळ स्वप्नरंजन की खरच अस घडलंय!)

    उत्तर द्याहटवा
  2. >>मस्त जायचं, भिजायचं...
    काश...... असं करता आलं असतं

    >>(बाकी हे सगळ स्वप्नरंजन की खरच अस घडलंय!)
    पाऊस खरंच कोसळतोय.....

    खूप धन्यवाद अभिषेक..... :)

    उत्तर द्याहटवा
  3. खूप धन्यवाद रोहिणीजी...
    खरंच पाऊस, पावसाची गाणी पावसात फेरफटका.... सगळंच....

    ब्लॉगवर तुमचं हार्दिक स्वागत :)

    उत्तर द्याहटवा
  4. इंद्रधनू..परत एकदा तुझ्या ह्या पोस्टमुळे पावसाचा अनुभव मिळाला...खूपच छान लिहिले आहे.
    शेवट पण मस्तच....चहा आणि पाऊस...मला तर वाटते जसे छत्री आणि पाऊस आहे न तसच हे चहा आणि पाऊस आहे! तुला काय वाटते?

    उत्तर द्याहटवा
  5. खूप धन्यवाद श्रियाताई....

    छत्री आणि पाऊस... आहा.... पावसात पूर्ण न भिजताही पावसाचा पूर्ण आनंद घ्यायचा तर छत्रीच हवी... जोड्या जुळवा मधले शब्द आहेत हे :)

    उत्तर द्याहटवा
  6. सुपर्बच लिहिलंयस.

    >> सोबतीला फक्त तू हवा होतास...
    हापिसात असताना तो सोबतीला असून काय उपयोग, धनुताई? ;)

    उत्तर द्याहटवा
  7. खूप धन्यवाद हेरंब...

    खरंच, हापिसात असताना तो सोबतीला असून काय उपयोग :)
    हापिसात त्याच्या सोबतीने फार तर चहा एन्जॉय केला असता... झालं असं की मी हापिसात होते पण मन हापिसात नव्हतं न.... :)

    उत्तर द्याहटवा
  8. हे सगळं मी सुद्धा अनुभवत होतो ....
    पण असं शब्दांकीत करायला जमेल तर ना! ...
    पण मी पाऊस चालु असताना हेडफोन नाही लावत ... गाणी काय कुठे पळुन जातायेत होय??
    अगदी छान लिहले आहे ..

    उत्तर द्याहटवा
  9. पण पाऊस ऐकायचा होता म्हणून गाणी बंद केली...मस्त लिहिलयंत राव! आणि मनाने मी ही....Thanks !

    उत्तर द्याहटवा
  10. प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद विजयजी....


    पण काही गाणी पावसात ऐकाविशीच वाटतात न..... :)

    उत्तर द्याहटवा
  11. खूप धन्यवाद संदीपजी

    ब्लॉगवर तुमचं हार्दिक स्वागत.... :)

    उत्तर द्याहटवा
  12. तेही स्वप्न होईल पूर्ण पुढच्या वेळी :-)

    उत्तर द्याहटवा
  13. आपके मुंह में घी-शक्कर सविताताई.... :)

    खूप धन्यवाद....

    उत्तर द्याहटवा
  14. भन्नाट लिहिले आहे.
    कार्यालयात असला तरी कसेही करून कांदा भाजीची सोय करता आली असती तर काय बहार आली असती.
    .

    उत्तर द्याहटवा
  15. धन्यवाद निनादजी ....
    पाऊस आणि कांदाभजी लय भारी..... :)

    ब्लॉगवर तुमचं हार्दीक स्वागत....

    उत्तर द्याहटवा
  16. khupach bhari....pausachi athvan aali..
    paus mhanje pruthivi var aplyala dilele swarg..
    tumche shabda kaljala bhidle
    asa vatla ki manatlya bhavnache shabda zale
    dhanyavad

    उत्तर द्याहटवा
  17. मनापासून प्रतिक्रिया दिल्याबद्दल अनेक धन्यवाद @gaur mha

    ब्लॉगवर तुमचं हार्दीक स्वागत.... :)

    उत्तर द्याहटवा