गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

बंदी आणि बहिष्कार...


कसं आहे ना, काही करायची वेळ आली की ते नेहमी दुसऱ्याने करायला पाहिजे.

एक भिकारडा सिनेमा बघायचा नाही म्हटलं तर आम्हाला जमत नाही.

सरकारने विसा नाकारायला पाहिजे, सरकारने पाक-चीन बरोबरचे सगळे उद्योग धंदे बंद करायला पाहिजेत, पण असहकार नावाची काही गोष्ट असते की नाही? सरकारला विविध करारांमध्ये गुंतल्याने ते शक्य होत नसेल पण तुम्हा-आम्हाला तर शक्य आहे ना! 

एक युक्तिवाद असा आहे की सिनेमा बनवून तयार आहे तर त्यात नुकसान भारतीय व्यक्तींचंच होणार. 
हेच जेव्हा सिनेमा तुम्हाला आवडत नाही म्हणून डब्यात जातो तेव्हा त्याच भारतीय व्यक्तींचं नुकसान होत नाही का? आणि होऊदेच नुकसान म्हणजे पुढच्या वेळी ताकही फुंकून पीतील.

सर्वप्रथम कला आणि क्रीडा क्षेत्राला टार्गेट केलं जातं असं म्हणता, कला म्हणजे बॉलीवूड आणि क्रीडा म्हणजे क्रिकेट. पण सगळ्यात जास्त ग्लॅमर पण यांनाच मिळतं ना? जेव्हा लोकांनी डोक्यावर घेतलेलं असतं तेव्हा बरे म्हणत नाहीत की या देशात सर्वात जास्त प्रेम लोक कलेवर करतात म्हणून? तेव्हा मग ते त्यांचं स्वकर्तृत्व असतं!

हेच बुद्धीजीवी देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा असते तर म्हणाले असते सरकारनेच भारत देश सोडून जायला पाहिजे, आम्ही का स्वातंत्र्य लढा पुकारायचा?

एखाद्या गोष्टीला बंदी होऊ शकत नसेल पण आपण त्यावर बहिष्कार तर टाकू शकतो ना?

३ टिप्पण्या:

  1. शिवाजी जन्माला याला पण शेजारच्या घरात 😠

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी बरोबर @मंदार, जेव्हा लोक अशा सिनेमांच्या समर्थनार्थ बोलतात तेव्हा डोक्यातच जातात. अतिविचारी असल्याने सामान्य गोष्टीच समजत नाहीत यांना...

    उत्तर द्याहटवा